टेणवासीयांनी दाखविले सरपंच,उपसरपंचांना काळे झेंडे
By admin | Published: July 24, 2016 03:59 AM2016-07-24T03:59:21+5:302016-07-24T03:59:21+5:30
ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंडच्या सरपंचपदी ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंचपदी सादिका शेख यांची गुप्त मतदानाने निवड झाली. नेमलेल्या समितीच्या अध्यक्ष व उपध्यक्षांनी
मनोर : ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंडच्या सरपंचपदी ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंचपदी सादिका शेख यांची गुप्त मतदानाने निवड झाली. नेमलेल्या समितीच्या अध्यक्ष व उपध्यक्षांनी विश्वासघात केल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून सरपंच उपसरपंच त्यांच्या बाजूला असलेल्या सदस्यांचा निषेध
केला.
पालघर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंड पाच वार्डाची संमिश्र समाजाची ग्रामपंचायत आहे. निवडणुका न घेता प्रत्येक वार्डात समित्या नेमून त्या समिती सदस्यांनी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे इच्छे प्रमाणे सदस्य दिले त्यानुसार प्रत्येक वॉर्डातील १३ सदस्यांची बिनविरोध निवड केली. त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाची निवडही वार्डातील समिती सदस्य मुख्य समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करण्याचे ठरले होते. एवढे ठरवूनही पांडुरंग गोवारी, किरण गोवारी, मुस्तफा राऊत, भरत तारवी, मुखत्यार शेख, भगवान साळुंखे व इतर सदस्यांनी तसे न करता त्यांचे हातात सत्ता राहावी म्हणून त्याची वेगळी चूल मांडली .
स्थापन केलेल्या एकता पॅनल समितीला डावलून आपल्या गटाचे सरपंच उपसरपंच करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
त्यामुळे झालेल्या निवडणुकीत बाबल्या गणपत पाडेकर, विष्णू लक्ष्मण गोवारी, रामदास जाण्या धडपी, मनीषा भगवान सांळुखे, सुवर्णा पांडू दुमाडा, शैला शनवार पंडित, सादिका शाहनवाज शेख यांनी नेमलेल्या समित्यांचे नियम मोडून मतदारांचा विश्वासघात करून सरपंच ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंच सादिका शेख यांना मतदान केले.
तर दुसरे बाजू निष्ठवान राहिलेले अल्ताफ आवारी, फिरोज पटेल, धर्मेश दळवी, सविता सदू गणेशकर, नंदा शांताराम जाधव यांच्या एकता पॅनल यांना अपयशाला सामोरे जावे लागेले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
(वार्ताहर)
सरपंच, उपसरपंचाची पळापळ
ग्रुप ग्रामपंचायत टेण सरपंच उपसरपंच निवडच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय समोर संतप्त ग्रामस्थांनी विश्वासघात करणाऱ्याना नवीन सरपंच उपसरपंच सदस्यांना व समिती अध्यक्षाना व सदस्यांना काळे झेंडे दाखवून विश्वासघात करणाऱ्यांचा निषेध निषेध असे घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. ते बंद गाडीत पळून गेले. कोणालाही न भेटता ग्रुप ग्रामपंचायत टेण सरपंच उपसरपंच निवडणुकीच्या ठिकाणी पोलीसठाण्या तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते.