शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

टेणवासीयांनी दाखविले सरपंच,उपसरपंचांना काळे झेंडे

By admin | Published: July 24, 2016 3:59 AM

ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंडच्या सरपंचपदी ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंचपदी सादिका शेख यांची गुप्त मतदानाने निवड झाली. नेमलेल्या समितीच्या अध्यक्ष व उपध्यक्षांनी

मनोर : ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंडच्या सरपंचपदी ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंचपदी सादिका शेख यांची गुप्त मतदानाने निवड झाली. नेमलेल्या समितीच्या अध्यक्ष व उपध्यक्षांनी विश्वासघात केल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून सरपंच उपसरपंच त्यांच्या बाजूला असलेल्या सदस्यांचा निषेध केला.पालघर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टेण टाकव्हाल सावरखंड पाच वार्डाची संमिश्र समाजाची ग्रामपंचायत आहे. निवडणुका न घेता प्रत्येक वार्डात समित्या नेमून त्या समिती सदस्यांनी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे इच्छे प्रमाणे सदस्य दिले त्यानुसार प्रत्येक वॉर्डातील १३ सदस्यांची बिनविरोध निवड केली. त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाची निवडही वार्डातील समिती सदस्य मुख्य समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करण्याचे ठरले होते. एवढे ठरवूनही पांडुरंग गोवारी, किरण गोवारी, मुस्तफा राऊत, भरत तारवी, मुखत्यार शेख, भगवान साळुंखे व इतर सदस्यांनी तसे न करता त्यांचे हातात सत्ता राहावी म्हणून त्याची वेगळी चूल मांडली .स्थापन केलेल्या एकता पॅनल समितीला डावलून आपल्या गटाचे सरपंच उपसरपंच करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत बाबल्या गणपत पाडेकर, विष्णू लक्ष्मण गोवारी, रामदास जाण्या धडपी, मनीषा भगवान सांळुखे, सुवर्णा पांडू दुमाडा, शैला शनवार पंडित, सादिका शाहनवाज शेख यांनी नेमलेल्या समित्यांचे नियम मोडून मतदारांचा विश्वासघात करून सरपंच ज्योत्स्ना गोवारी व उपसरपंच सादिका शेख यांना मतदान केले. तर दुसरे बाजू निष्ठवान राहिलेले अल्ताफ आवारी, फिरोज पटेल, धर्मेश दळवी, सविता सदू गणेशकर, नंदा शांताराम जाधव यांच्या एकता पॅनल यांना अपयशाला सामोरे जावे लागेले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.(वार्ताहर) सरपंच, उपसरपंचाची पळापळग्रुप ग्रामपंचायत टेण सरपंच उपसरपंच निवडच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय समोर संतप्त ग्रामस्थांनी विश्वासघात करणाऱ्याना नवीन सरपंच उपसरपंच सदस्यांना व समिती अध्यक्षाना व सदस्यांना काळे झेंडे दाखवून विश्वासघात करणाऱ्यांचा निषेध निषेध असे घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. ते बंद गाडीत पळून गेले. कोणालाही न भेटता ग्रुप ग्रामपंचायत टेण सरपंच उपसरपंच निवडणुकीच्या ठिकाणी पोलीसठाण्या तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते.