जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त; संपूर्ण पोलीस फोर्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:25 AM2018-12-31T00:25:11+5:302018-12-31T00:25:23+5:30

वर्षातील शेवटच्या दिवसाला (३१ डिसेंबर) अलविदा करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून ह्या दरम्यान कुठलीही गंभीर घटना घडून नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीससज्ज झाले आहे.

The settlement settlement everywhere in the district; The entire police force deployed | जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त; संपूर्ण पोलीस फोर्स तैनात

जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त; संपूर्ण पोलीस फोर्स तैनात

Next

पालघर : वर्षातील शेवटच्या दिवसाला (३१ डिसेंबर) अलविदा करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून ह्या दरम्यान कुठलीही गंभीर घटना घडून नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीससज्ज झाले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्हावासीय सज्ज झाले असून जिल्ह्यात विविध भागात हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर प्रत्येक घडामोडीवर राहणार असून त्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज आहे. जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग विरोधी मोहीम राबवितांना मद्यपान केलेल्या आणि बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. या दरम्यान प्रभावी मोहीम राबवून रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्ड, हॉटेल्स, लॉजिंग, फार्म हाऊस,सागरी किनारे आदी ठिकाणी रस्त्यावरु न जाणाºया वाहनांची तपासणी केली जाणार आहे पहाटे ५ वाजे पर्यंत हॉटेल्स, परमिट रूम उघडे ठेवण्यात येणार असून मद्यपींकडून बेशिस्त वर्तणूक, हाणामारी, छेडछाड होऊ नये यासाठी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. मॉल्स, सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, प्रार्थनास्थळे आदी आस्थापनांशी संपर्क करून सुरिक्षततेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येणार आहे.
सागरी किनारी व पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू राहणार असून काही ठिकाणी नाकाबंदी ही ठेवण्यात आली आहे. यासाठी १०७ पोलीस अधिकारी,व ७३४ पोलीस कर्मचाºयाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: The settlement settlement everywhere in the district; The entire police force deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस