महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेने पालघरचा गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 02:23 AM2019-10-25T02:23:03+5:302019-10-25T06:08:08+5:30

काँग्रेसचे नम पराभूत; पश्चिम पट्ट्याने तारले

Shiv Sena maintained the fort of Palghar | महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेने पालघरचा गड राखला

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेने पालघरचा गड राखला

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील एकूण २४ फेऱ्यांपैकी पाचव्या फेरी नंतरच शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत ४० हजार १४८ मताधिक्याने विजय मिळविला. बहिष्काराच्या मुद्द्याने गाजलेल्या या मतदारसंघात नेहमीप्रमाणे पश्चिम पट्ट्याने वनगा यांना साथ दिल्याने हा सेनेचा बालेकिलल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पालघर विधानसभेत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेना महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वणगा आणि काँग्रेसचे योगेश नम यांच्यात झाली. गुरुवारी सकाळी पालघरच्या स. तु. कदम या महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून १ हजार २३२ मतांनी काँग्रेसचे योगेश नम आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले असले तरी पाचव्या फेरीमध्ये श्रीनिवास वनगा यांनी ४९२ मतांनी आघाडी घेतली.

सेनेने आघाडी घेतल्याची माहिती समाजमाध्यमांवर झळकायला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हळूहळू मतदान केंद्राबाहेर जमायला सुरूवात केली. ८ व्या फेरीमध्ये सेनेने २ हजार ६३३ मतांची आघाडी घेतल्यानंतर सेनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करायला सुरूवात झाली. सतत वाढत जाणारे मताधिक्य आणि ६ हजार १२८ मतांच्या आघाडीनंतर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशाी जोरदार घोषणाबाजी होऊ लागली.

यामध्ये महिला कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांचा सहभाग मोठा होता. पश्चिम भागातील मतदान पेट्यांमधील मतांची रसद सेनेला मिळू लागल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या विजयाच्या दिशेने सुसाट निघालेल्या वारूला रोखण्याची किमया कुठलाही
उमेदवार करू शकला नाही. अखेर २४ फेºयांनंतर श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या शंकर नम यांचा ४० हजार १४८ मतांनी पराभव केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले, आणि शिवसेनेचा एकच जल्लोष सुरू झाला.

दरम्यान, वाढवण बंदर आणि डहाणू पर्यावरण प्राधिकरण हटवणे आणि केळवे पूर्व, झंजरोली, मायखोप आदी भागातील उड्डाणपूल, रस्ते, सोयीसुविधांची वानवा या विरोधात २३ गावपाड्यांनी टाकलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० हजार मतदारांनी मतदान टाळले. यातील मतदारांचा मोठा टक्का हा सेनेचा असल्याने प्रचंड मताधिक्य प्राप्त करण्याची संधी गमावली.

Web Title: Shiv Sena maintained the fort of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.