तरुणीला मारहाण: चौघींवर कारवाई

By admin | Published: July 29, 2016 02:51 AM2016-07-29T02:51:20+5:302016-07-29T02:51:20+5:30

एका कॉलेज तरुणीला नालासोपारा-वसई दरम्यान लोकलच्या डब्यात शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार महिला प्रवाशांना ताब्यात घेऊन वसई रेल्वे पोलिसांनी

Strike the woman: Action on the four-wheeler | तरुणीला मारहाण: चौघींवर कारवाई

तरुणीला मारहाण: चौघींवर कारवाई

Next

वसई : एका कॉलेज तरुणीला नालासोपारा-वसई दरम्यान लोकलच्या डब्यात शिवीगाळ आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार महिला प्रवाशांना ताब्यात घेऊन वसई रेल्वे पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतर त्यांना सोडून दिले.
वसईतील वर्तक इंजिनिरिंग कॉलेजमध्ये शिकणारी ऋतुजा नाईक मंगळवारी विरारहून नेहमीप्रमाणे सकाळची लोकल पकडून वसईला जात होती. लोकलचा डबा खचाखच महिला प्रवाशांनी भरला होता. ऋतुजाला वसईला उतरायचे होते. पण, दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी तिला आडकाठी केली. चार महिलांनी दादागिरी करून तिला शिवीगाळ व मारहाण केली. तिचे कपडे देखील फाडले. त्यानंतरही ऋतुजा वसई स्टेशनवर उतरली आणि तिने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी सकाळी ऋतुजा सोबत जाऊन दादागिरी करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले. दीपाली सावंत ,नेहा ठाकूर नयना ठाकूर, अश्विनी गुरुव अशी महिलांची नावे आहेत. चार जणींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. लोकल ट्रेनमधील महिलांची दादागिरी थांबली पाहिजे अशी मागणी ऋतुजाच्या कुटुंबीयांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Strike the woman: Action on the four-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.