तारापूर प्रकल्पग्रस्तांचे ३० मे पासून सर्वेक्षण

By Admin | Published: May 29, 2017 05:42 AM2017-05-29T05:42:36+5:302017-05-29T05:42:36+5:30

तारापूर प्रकल्पग्रस्तांचे नवीन पोफरण व अक्करपट्टी गावात पुनर्वसन करताना बांधून दिलेली परंतु सध्या मोडकळीस आलेली निकृष्ट

Survey of Tarapur project affected people from May 30 | तारापूर प्रकल्पग्रस्तांचे ३० मे पासून सर्वेक्षण

तारापूर प्रकल्पग्रस्तांचे ३० मे पासून सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज़ नेटवर्क
बोईसर : तारापूर प्रकल्पग्रस्तांचे नवीन पोफरण व अक्करपट्टी गावात पुनर्वसन करताना बांधून दिलेली परंतु सध्या मोडकळीस आलेली निकृष्ट घरे व त्या घरांची दुरूस्ती तसेच प्रकल्पग्रस्तांचा सध्याचा व्यवसाय, रोजगार, प्रलंबित प्रश्न तसेच समस्याचे सर्वेक्षण ३० मे ते ३ जून असे ५ दिवस करण्यात येणार आहे
तारापूर अणुउर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणी करीता अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांनी देशाच्या विकासासाठी स्वत:चे राहते घरे व शेत जमीनी दिल्या. परंतु त्या मोबदल्यात गावकऱ्यांना निकृष्ट दर्जाची घरे दिली गेली. आश्वासन देऊनही प्रकल्पात कायम स्वरूपी नोकरी न मिळाल्याने अखेर प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्या करीता न्या. अभय ओक यांची एक सदस्य समिती नियुक्त केली.
१२ मे रोजी समितीकडून तारापूर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला होता. त्या वेळी त्यांनी निकृष्ट घरे, रस्ते, गटारांची दुर्दशा या बरोबरच पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या घरांची तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी घरे, व्यवसाय व रोजगराचा सर्व्हे करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांना न्या. ओक यांनी दिले होते.

प्रकल्पग्रस्तांना आवाहन...

सर्व प्रकल्पग्रस्तांनी सर्व्हे दरम्यान घरे दाखवून माहिती देण्या करीता कुटुंबप्रमुखाने हजर राहून आपल्या कुटुंबाचा रोजगार व व्यवसायासंबंधीची यथायोग्य माहिती द्यावी असे आवाहन विजय तामोरे, पोफरण च्या सरपंच देवकी खडके, उपसरपंच रविंद्र मोरे ,श्रीधर तामोरे वीरेंद्र पाटील, शेखर तामोरे यांनी पोफरणवासियांना केले आहे.

Web Title: Survey of Tarapur project affected people from May 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.