मच्छीमारांची मागणी : पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:02 PM2019-11-04T23:02:18+5:302019-11-04T23:02:44+5:30
मच्छीमारांची मागणी : निषिद्ध क्षेत्रात मासेमारी, चक्रीवादळामुळे घेतला डहाणूत आश्रय
पालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीजवळील समुद्रात असलेला मत्स्यसाठा पकडून नेण्यासाठी आलेल्या शेकडो पर्ससीन ट्रॉलर्स समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने संरक्षणासाठी डहाणूसह अन्य मच्छीमार गावांतील बंदरात आश्रयाला आल्या होत्या. दरम्यान, निषिद्ध क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या या पर्ससीन ट्रॉलर्सवर कडक कारवाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे.
‘क्यार’ आणि ‘महा’ या समुद्रात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या भीतीने जिल्ह्यातील सर्व बोटी किनाºयावर विसावल्या आहेत. प्राणहानी तसेच वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सावधानतेच्या इशाºयाचा मान राखत इथल्या मच्छीमारांनी आपली मासेमारी पूर्णत: बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे मत्स्यसाठ्याच्या कमतरतेला कारणीभूत ठरलेले पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक मात्र, वादळाच्या इशाºयाला न जुमानता आपल्या अवाढव्य ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीला पाठवीत आहेत. १२ नॉटिकलच्या (सागरी मैल) आत पर्ससीन मासेमारीला बंदी असतानाही हे पर्ससीन धारक मोठ्या संख्येने या भागात येत असल्याच्या मच्छीमारांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील मच्छीमारांच्या गावासमोरील निषिद्ध क्षेत्रात येऊन माशांचे थवे पकडून घेऊन जाणाºया या बेकायदेशीर ट्रॉलर्सविरोधात कारवाईसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. त्यानंतर शासनाने निषिद्ध क्षेत्रात मासेमारी करणाºया या ट्रॉलर्स विरोधात कारवाईचा बडगा उचलला होता. या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्यानंतर अशा बेकायदेशीररित्या मासेमारी करणाºया ट्रॉलर्सविरोधात कारवाई करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाला गस्ती नौका, स्पीड बोटी देण्यात आल्या आहेत. त्यांची संख्या कमी असल्याने या ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय विभागापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
जिल्ह्याला ११० किमी.चा समुद्र किनारा असून किनाºयापासून १०० नॉटिकलपर्यंत (१ नॉटिकल म्हणजे १.८० किलोमीटर्स) मासेमारी केली जाते. परंतु स्थानिक मच्छीमारांनी किनाºयाजवळील भागात लावलेल्या आपल्या डोल कवीवरील जाळ्यातील माशांच्या वासावर येणाºया घोळ, दाढे, कोत, शिंगाळे आदी माशांचे थवे पकडण्यासाठी हे ट्रॉलर्स किनारपट्टी लगतच्या भागात येतात. अशा बेकायदेशीर ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात मत्स्यव्यवसाय विभाग कमी पडतो. या विभागाकडील गस्ती नौकेच्या अपुºया संख्येमुळे कारवाईत मर्यादा येत असल्याने स्थानिक मच्छीमार निषिद्ध क्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी करणाºया ट्रॉलर्सला पकडून आपल्या बंदरात आणीत आहेत.
निषिद्ध क्षेत्र ठरवा
च्डहाणू भागातल्या बंदरात आश्रयाला आलेल्या ट्रॉलर्स या निषिद्ध क्षेत्रात मासेमारी साठी आलेल्या ट्रॉलर्स असल्याचा संशय स्थानिक मच्छीमार व्यक्त करीत असून आम्ही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करायचे.
च्तर दुसरीकडे या महाकाय ट्रॉलर्सने मात्र बिनदिक्कतपणे आमच्या भागातील मत्स्यसाठे पकडून न्यायचे, हा प्रकार बंद व्हायला हवा अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे. शासनाने समुद्रातील निषिद्ध क्षेत्राची आखणी करून बेकायदेशीर मासेमारी करणाºया ट्रॉलर्स विरोधात कडक कारवाई करावी, या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.