नालासोपाऱ्यात १.८६ कोटींचा टीडीआर घोटाळा

By admin | Published: July 25, 2016 02:48 AM2016-07-25T02:48:29+5:302016-07-25T02:48:29+5:30

वसई विरार महापालिकेच्या रस्त्याचा टीडीआर बिल्डरला विकून १ कोटी ८६ लाख रुपांचा घोटाळा नालासोपारातील वाळींजकर कुटुंबाने केल्याचे उघडकिस आले

TDR scam of Rs 1.86 crore in Nalaspar | नालासोपाऱ्यात १.८६ कोटींचा टीडीआर घोटाळा

नालासोपाऱ्यात १.८६ कोटींचा टीडीआर घोटाळा

Next

वसई : वसई विरार महापालिकेच्या रस्त्याचा टीडीआर बिल्डरला विकून १ कोटी ८६ लाख रुपांचा घोटाळा नालासोपारातील वाळींजकर कुटुंबाने केल्याचे उघडकिस आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील सर्व्हे.क्र.३४ प्लॉट नं २८ मध्ये रस्त्याखाली गेलेली ५ हजार २३४ चौ.मी.ही जागा अंधेरी येथील चंद्रकांत वाळींजकर आणि कृष्णा वाळींजकर यांच्या मालकीची होती. सातबारा उताऱ्यावरही तशी नोंद होती.त्यातील सर्व्हे.क्र.३४/१ मधील रस्त्याखालील जमिनीच्या सातबाऱ्यात सोपाऱ्याच्या तलाठ्याला हाताशी धरून व फेराफार करून रमेश वाळींजकर, शांताराम वाळींजकर, प्रशांत वाळींजकर आणि भानुमती वाळींजकर यांनी स्वत:ची नावे चढवली.
त्यानंतर त्यांनी चंद्रकांत आणि कृष्णा वाळींजकर यांच्या नावाने बोगस कुलमुखत्यारपत्र आणि पॅन कार्ड बनवले. त्यासाठी चंद्रकांत आणि कृष्णा यांच्या नावाने तोतया माणसे उभी करून रजिस्ट्रेशनही केले. कृष्णा यांचा ५ जून २०१० ला मृत्यू झाला असतांनाही त्यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र बनवण्यात आले. ही जागा स्वत:च्या नावे केल्यानंतर वाळींजकर कुटुंबाने त्यातील ३४५१ चौ.मी.जागा महापालिकेला हस्तांतरीत केली. त्यामुळे पालिकेने त्यांना तितकाच टीडीआर दिला. हा टीडीआर शांताराम वाळींजकर यांनी विरार येथील महादेव गोपाळ पाटील,नालासोपारा येथील आदिराज लक्ष्मी डेव्हलपर्सचे निलेश पटेल आणि महावीर डेव्हलपर्सचे जितेंद्र जैन यांना १ कोेटी ८४ लाख रुपयांना विकला. ही बाब मूळ मालक चंद्रकांत वाळींजकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फसवणूक करणाऱ्या वाळींजकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: TDR scam of Rs 1.86 crore in Nalaspar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.