गावात स्मशानभूमी नाही म्हणून चक्क रस्त्यावर अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:11 PM2019-04-30T23:11:08+5:302019-04-30T23:11:27+5:30
गावकऱ्यांनी व्यथा: स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता केला बंद
पारोळ : वसई शहराच्या वेशीवर असलेल्या माजीवली गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी पारोळ भिवंडी रस्त्यालगत करण्याची वेळ माजीवली गावातील गावकऱ्यांवर आली आहे. या आधुनिक काळात अंत्यविधीसाठी विविध उपकरणे असताना या गावात स्मशानभूमी नाही ही एक शोकांतिका आहे.
या गावात स्मशानभूमी नसल्याने नाळ्यालगतच्या जागेत अनेक वर्षांपासून या गावातील अंतविधी उघड्यावर होते. ‘लोकमत’ ने सुद्धा या बाबत अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केले होते. पण जागेअभावी स्मशानभूमी बांधली गेली नसल्याने तेथेच हा अंत्यविधी होतोे. या गावातील मधुकर चोघळा यांचे २८ मे रोजी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी नाल्यात जाण्यासाठी चा रस्ता खाजगी जागेतून होता. मात्र, तो जागा मालकाने बंद केल्याने हा अंतविधी मार्गालगत करण्यात आला. आज अतिदुर्गम भागात सुद्धा स्मशानभूमी ची सुविधा आहे मात्र, आमच्या गावात का नाही असा सवाल या गावातील नागरीक प्रशासनाला विचारीत आहेत.
आमच्या गावात अंत्यविधीसाठी सोय नसणे ही आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. या बाबत नातेवाईक ही आमची कान उघडणी करतात. या साठी प्रशासनाने या बाबी कडे लक्ष देण्याची गरज आहे -विजय चोघळा, गावकरी, माजीवली