वसई किल्ल्यात यंदा १०८ फुटी गुढी
By admin | Published: March 27, 2017 05:30 AM2017-03-27T05:30:39+5:302017-03-27T05:30:39+5:30
यावर्षी आमची वसई समूहातर्फे बांबूची १०८ फुट उंच गुढी उभारण्यात येणार आहे. आजपर्यंतची सर्वात उंच
वसई : यावर्षी आमची वसई समूहातर्फे बांबूची १०८ फुट उंच गुढी उभारण्यात येणार आहे. आजपर्यंतची सर्वात उंच गुढी ५३ फुटी असल्याची नोंद उपलब्ध आहे.
मंगळवारी निघणाऱ्या तीन नववर्ष शोभा यात्रेत पारंपरिक वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नरवीर चिमाजी आप्पा पेशवे व अनेक ऐतिहासिक व्यक्तीचित्रे सहभागी होणार आहेत. सर्व जातीजमातीचे लोक उपस्थिती नोंदवणार आहेत. दिव्यांग बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत.
शोभायात्रेत जनसेवा हॉस्पिटल, रवी हॉस्पिटल हे अॅम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय सहाय्य करणार आहेत. त्याचबरोबरीने नयी दिशा सामाजिक संघटना व अपंग जनशक्ती संस्थाही सहभागी होणार आहेत. नववर्ष शोभायात्रेत सहभागी होणाऱ्यांना फेटे, ध्वज, झेंडे व अल्पोपहार दिला जाणार आहे. श्री राम मंदीर बोळींज विरार पश्चिम येथून सकाळी ७ वाजता, श्री काशीविश्वेश्वर मंदीर गोखिवरे, वसई पूर्व येथून सकाळी ८ वाजता, श्री वाल्मीकेश्वर मंदीर नायगाव पश्चिम येथून सकाळी ८ वाजता तीन शोभायात्रा वसई किल्ला येथे रवाना होतील. (प्रतिनिधी)