शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

वसई विरार पट्ट्यात चाळमाफीयांचा जोर

By admin | Published: July 07, 2015 11:11 PM

जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकांमुळे अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम ठप्प झाली होती. यासंधीचा फायदा घेत वसई, विरार, नालासोपारा व अन्य भागात चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले.

वसई : जिल्हापरिषद, पंचायत समिती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकांमुळे अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम ठप्प झाली होती. यासंधीचा फायदा घेत वसई, विरार, नालासोपारा व अन्य भागात चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले. आजवर तोडण्यात आलेली अनेक बांधकामे पुन्हा डौलात उभी राहिली आहेत. कार्यवाहीमध्ये शिथीलता आल्यामुळे भविष्यात अधिकाधिक अनधिकृत बांधकामे होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. आजमितीस या उपप्रदेशात सुमारे १ लाखावर अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ३ वर्षापूर्वी मोहिम राबवण्यास सुरूवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून सुमारे ७ ते ८ हजार अनधिकृत बांधकामे उध्वस्त करण्यात आली. परंतु गेल्यावर्षी लोकसभा त्यानंतर विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, सहकारी बँका व नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुका यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही मोहिम स्थगित करण्यात आली.या परिस्थितीचा फायदा घेत भूमाफीया व चाळमाफीयांनी पुन्हा डोके वर काढले व अवघ्या ३ ते ४ महिन्यात हजारो बांधकामे पुन्हा उभी राहिली. चाळमाफीया पुन्हा सक्रीय झाल्यामुळे गरजू नागरीकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.अशी होते फसवणूकबांधकाम सुरू होण्यापूर्वीच महानगरपालिकेने बांधकामाची संपुर्ण कागदपत्रे तपासून ही कामे रोखल्यास सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. परंतु या बांधकामांना वीज, पाणी व सर्वसुविधा त्वरीत उपलब्ध होत असल्यामुळे नागरीकांची फसवणूक होत असते.

काही चाळमाफीयांनी अनधिकृत बांधकामे असतानाही महानगरपालिकेची मंजुरी असल्यासंदर्भातील निळ्या रंगाचे फलकही लावले आहेत. वास्तविक असा गैरप्रकार करणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाने महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन अंतर्गत (एमआरटीपी) कारवाई करायला हवी असे फसगत झालेल्या सुधाकर साळवी यांचे म्हणणे आहे.

सध्या नालासोपारा पूर्व भागातील तुळींज, संतोषभुवन, धानीवबाग, पेल्हार, विरार येथे चंदनसार, कोपरी, शिरसाड, वसई येथे सातिवली, वालीव, कामण, चिंचोटी, पोमण व कोल्ही ही सर्व गावे अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी अनधिकृत गोदामे बांधणारे एक रॅकेट सक्रीय असून त्यामध्ये परप्रांतीयांचा समावेश आहे. ही गोदामे भाड्याने नावाजलेल्या आॅटोमोबाईल कंपन्यांना देण्यात येतात. तर काही हॉटेलमालकांनी आपल्या हॉटेलमध्ये सरसकट अनधिकृत बांधकामे केली आहेत.