वसई विरारच्या स्वच्छ अभियानाचे तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:58 AM2018-01-20T00:58:34+5:302018-01-20T00:58:40+5:30
वसई विरार महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतल्याचे फलक शहरभर लावले आहेत. मात्र, महापालिका हद्दीत श्री क्षेत्र निर्मळ तलावाशेजारी कचरा
वसई : वसई विरार महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतल्याचे फलक शहरभर लावले आहेत. मात्र, महापालिका हद्दीत श्री क्षेत्र निर्मळ तलावाशेजारी कचरा साठवून पेटवला जात असल्याने प्रदुषणात भर पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतल्याचे लोकांना समजण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्चून शहरभर मोठ मोठे बॅनर लावलेले आहेत. मात्र, निर्मळ तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे. त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो पेटवून प्रदुषणात भर घालण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे जमा असलेल्या कचºयाशेजारीच सफाई ठेकेदाराचे झोपडीवजा कार्यालय आहे. आपल्या कार्यालयाशेजारी कचºयाचा ढिग आणि जळत असलेला कचरा उचलण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.