राहुल वाडेकर, विक्रमगडकमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ कारण त्याला मिळणारा कमी भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई व निसर्गाचा लहरीपणा आहे. विक्रमगड तालुक्यातील घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्याच्या भातपिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या या पिकाकडे दुर्लक्ष करीत असुन त्यामूळे एक चांगले भातपीक धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात ५५ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे़तरुणाई शेती उत्पादनाबाबत उदासिन धोरणराबाबत आहे़ काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे़ त्याच्या उत्पादनासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेच व खर्चही बराच करावा लागतो़ हया तांदळाचा दाना लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर नुकसान सहन करावे लागते़ कारण गोड तांदुळास कीड लवकर लागते व त्यापासून खुप जपावे लागते, मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत विक्रमगड येथील शेतकरी निलेश सांबरे यांनी लोकमतकडे व्यक्त केले.विक्रमगड तालुक्यातील मृदा,पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलमचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात होते.एक सेंटीमिटर लांबीचा दाणा व सुगंध यामुळे हा खाण्यासाठी रुचकर म्हणून प्रसिध्द होता. याची सर्वत्र मोठी मागणी आहे़ विक्रमगडच्या मातीत हे रुचकर पीक तयार होत असल्याने या पिकाने आपले स्थान पक्के केले होते़ परंतु कालांतराने शेतकरीही आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाऱ्या भात पिकांकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चीक असलेल्या कोलमचे उत्पादन घेण्यास उदासीन झाला आहे़पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असे़ त्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे आणि त्या कणग्यांना शेणाने सावरुन सुरक्षित पॅकींग करुन बंद करुन भरुन ठेवत असायचे़ मात्र अलिकडे भातपिकांच्या संकरित व सुधारित जातीमुळे हे कष्टाळू भातपीक दुर्लक्षित होउ लागले आहे़ पूर्वीच्या जमान्यात आताची महागाई व येणारा खर्च जाउन बाजार भावही योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील केवळ श्रीमंत शेतकरी व अपवाद वगळता काही मोजकेच शेतकरी हे दर्जेदार पीक घरी खाण्याकरिता घेत आहेत.
विक्रमगडचा गावठी कोलम (झिनी), तांदूळ नामशेष होणार?
By admin | Published: July 14, 2016 1:33 AM