Virar Covid Hospital Fire: विजय वल्लभ रुग्णालयातील आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी; आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:35 PM2021-04-24T16:35:38+5:302021-04-24T16:36:06+5:30

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुग्णालयातील स्थितीचा घेतला आढावा

Virar Covid Hospital Fire union minister ramdas athavale demands judicial custody | Virar Covid Hospital Fire: विजय वल्लभ रुग्णालयातील आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी; आठवलेंची मागणी

Virar Covid Hospital Fire: विजय वल्लभ रुग्णालयातील आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी; आठवलेंची मागणी

googlenewsNext

विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातीलतील अतिदक्षता विभागातील एसी च्या कॉम्प्रेसर चा स्फोट होऊन शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत 15 कोरोना रुग्ण यांचा होरपळून मृत्यू झाला होता. विरारच्या विजय वल्लभ  रुग्णालयाच्या गंभीर  जळीत घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची आठवले यांनी  मागणी केली आहे.

दरम्यान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.24) सकाळी 11 वाजता भेट दिली आणि या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्या सर्व रुग्णांबाबत शोकभावना प्रकट केली. यावेळी आठवले यांनी  संपूर्ण रुग्णालय व ज्या अतिदक्षता विभागात हे जळीत कांड घडले त्या घटनास्थळाची तासभर पाहणी करुन जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. घडलेली घटना अत्यंत वेदनादायक व मन सुन्न करणारी आहे या सर्व मृत रुग्णांना आदरांजली वाहून अन्य जखमी व इतरत्र हलवण्यात आलेले रुग्णांच्या प्रति ही तीव्र दुःख व्यक्त करताना स्पष्ट केलं की,या संपूर्ण घटनेने केवळ विरारच नाही तर या घटनेतील आगीची झळ अवघ्या देशभरात पोहोचली असून राज्य शासनाने समिती नेमली आहे मात्र नुसत्या समिती गठीत करून काहीही होत नाही तर याउलट या संपूर्ण जळीत घटनेची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे आणि तरच मृत रुग्णांना व अन्य जखमीना न्याय मिळेल आणि तशी मागणी राज्य व केंद्रीय पातळीवर केली जाईल असे ही माध्यमाना या भेटी वेळी सांगितले.

या भेटी वेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सोबत जिल्हा व तालुक्यातील महसूल, पोलीस व महापालिका प्रशासनाचे अधिकारी व आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 

Web Title: Virar Covid Hospital Fire union minister ramdas athavale demands judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.