लग्नपत्रिकेला चढू लागला वारली पेंटिंगचा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:13 AM2019-05-12T01:13:55+5:302019-05-12T01:14:12+5:30

वैशाखाच्या आगमनासह लग्नसराईच्या दिवसांनाही सुरुवात झाली आहे. यासाठी पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या आमंत्रण पत्रिकेवर वारली पेंटिंगचा साज चढविण्यात सध्या अनेकांचा भर दिसतो आहे.

Warli paintings embarked on wedding book | लग्नपत्रिकेला चढू लागला वारली पेंटिंगचा साज

लग्नपत्रिकेला चढू लागला वारली पेंटिंगचा साज

googlenewsNext

- अनिरु द्ध पाटील

बोर्डी : वैशाखाच्या आगमनासह लग्नसराईच्या दिवसांनाही सुरुवात झाली आहे. यासाठी पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या आमंत्रण पत्रिकेवर वारली पेंटिंगचा साज चढविण्यात सध्या अनेकांचा भर दिसतो आहे. त्यामुळे ही चित्रलिपी जनमानसात पोहोचून अधिकाधिक लाकप्रिय होण्यास हातभार लागणार आहे.
आदिवासी संस्कृतीमध्ये वारली चित्रकलेला अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान आहे. किंबहुना जागतिक स्तरावर ही चित्रलिपी भारत देशाची ओळख बनली आहे. विविध शासकीय संकुले, कार्यालये, चौक आणि संस्थांच्या इमारती या वारली पेंटिंगने चितारलेल्या दिसतात. तर बाजार, मॉल आणि आॅनलाइन शॉपिंगद्वारे या वस्तूंना मोठी मागणी आहे. त्यामुळे हीच संकल्पना लग्नपत्रिका छापणाºया प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांनी उचलून धरली असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या पत्रिकांच्या छपाईकरिता वापरण्यात येणाºया कागदानुसार दरांमध्ये भिन्नता असल्याची माहिती बोर्डीतील छपाई व्यावसायिक चेतन ठाकरे यांनी दिली.
आदिवासी समाजातील विविध दैनंदिन घटना अथवा धार्मिक
प्रसंग किंवा विवाहावेळी काढला जाणारा चौक असे नानाविविध प्रसंग असलेली वारली पेंटिंग उपलब्ध आहेत. त्यानुसार ग्राहकांना ती दाखविल्यानंतर त्यांनी निवडलेल्या पेंटिंगची छपाई केली जाते. आता लग्नसराईत विशेषत: पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून अशा लग्नपत्रिकांना मागणी असल्याचे दिसते.

वारली चित्रकला असे झाले नामकरण
पद्मश्री जिव्या म्हसे यांची चित्रं पाहून या कलेच्या प्रकाराला कोणते नाव द्यावे, असा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हसे यांना विचारला होता. या वेळी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परंपरेचे नाव द्या, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर या चित्रलिपीचे नामकरण ‘वारली चित्रकला’ असे झाले. त्या अनुषंगाने ही चित्रकला आणि हा चित्रकार जगाला परिचित झाला.

Web Title: Warli paintings embarked on wedding book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर