‘जयसागर’चे पाणी १५ आॅगस्टपर्यंत पुरणार

By admin | Published: May 30, 2017 05:06 AM2017-05-30T05:06:55+5:302017-05-30T05:06:55+5:30

या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल

The water of 'Jaisagar' will be available till 15th August | ‘जयसागर’चे पाणी १५ आॅगस्टपर्यंत पुरणार

‘जयसागर’चे पाणी १५ आॅगस्टपर्यंत पुरणार

Next

हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल इतका जलसाठा सध्या आहे. त्यामुळे पाऊस जरी उशिरा पडला तरी जव्हारकरांना नेहमी प्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर व इतर स्त्रोतांनी पाणी पुरवठा केला जातो, मात्र जव्हारकरांसाठी राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणामुळे जव्हारचा पाण्याचा प्रश्न सुटत असून वर्षा भराचे नियोजन केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काही भागात जुनी पाईप लाईन असल्यामुळे तथा काही ठिकाणे उंचावर असल्यामुळे पाणी पोहचत नाही, यामुळे काही भागात पाणी असूनही पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्याची मागणीही होत आहे.
मागील वर्षी धरणाला मोठ्याप्रमाणात गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले होते, मात्र त्यावेळी तात्काळ नियोजन करून निविदा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गळती थांबविण्यात परिषदेला यश आले होते, गळती थांबल्यामुळे यंदा पाण्याची मुबलकता आहे. मात्र असे असले तरी जनतेने पाणी जपून वापरावे म्हणजे ते अधिक काळ पुरविता येईल.असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळेच आजूबाजूच्या गावपाड्यांनाही पिण्याचे पाणी सुलभतेने मिळते आहे.

Web Title: The water of 'Jaisagar' will be available till 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.