बोईसर : रात्रीपासून दुपारपर्यत मुसळधार पाऊस पडल्याने तारापूर-कुडण व बोईसर आणि सर्व परिसरात मोठया प्रमाणात पाणीच पाणी साचून काही ठिकाणांना मोठ्या तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतल्याने आणि समुद्राला ओहोटी लागल्याने धोका टळला. तर बोईसर पूर्व भागातील गावांचा संपर्क तुटला होता. धोडीपाडा, सरावली, खैरेपाडा येथील रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. कुडण नवपाडा येथील समाज मंदिराजवळील मैदान, तारापूर-चिंचणी सागरी महामार्ग, तारापूर गावातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी होते. बाणगंगा नदीतून पाणी वाहत होते. काही सहा आसनी रिक्षांना वायपर नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. पूल पाण्याखाली गेल्याने नागझरी नेहा, लोवरा, काटाळे ते मालवण पर्यंतच्या गावांचा संपर्क तुटला होता. (वार्ताहर)
तारापूर-कुडण-बोईसर येथे पाणीच पाणी
By admin | Published: July 31, 2016 3:03 AM