ओव्हरहेड वायर तूटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक थोड्या फार प्रमाणात विस्कळीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:10 PM2020-10-06T13:10:46+5:302020-10-06T13:11:34+5:30
सकाळी 6 ची घटना ; लोकलसेवा पूर्ववत
वसई : पश्चिम रेल्वेचे सर्वात अतिगर्दीचे रेल्वे स्टेशन असलेल्या नालासोपारा रेल्वे प्लेटफॉर्म क्र.4 जवळ आज (दि,6) सकाळी 6 च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यानं काही वेळ येथील लोकल सेवा वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, पश्चिम रेल्वेने तात्काळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केल्यानं या घटनेचा रेल्वे लोकल सेवेवर जास्त परीणाम न होता काही वेळानं लोकल सेवा पूर्ववत झाली.
दरम्यान पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायर च्या घटनेनंतर लागलीच नालासोपारा रेल्वे स्थानक प्लेटफॉर्म क्र.3 व 4 च्या रेल्वे ट्रॅक वरील लाईन बंद करून या ट्रॅक वरील गाड्या या 1 व 2 नंबरच्या प्लॅटफॉर्म वरून सोडण्यात येत आहेत. सकाळच्या घटनेनंतर तात्काळ रेल्वेचे कर्मचारी वर्गानी या तुटलेल्या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतल असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठीच लोकल सेवा सुरु आहेत. आणि येथील रेल्वे सेवा आता 1 आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म वरून सुरु असल्याने अगदी सकाळी व त्यानंतर ही येथील लोकल सेवेवर फारसा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे चित्र दिसून आले.