ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे काम पालघर जिल्ह्यात बंद

By admin | Published: July 14, 2016 01:34 AM2016-07-14T01:34:13+5:302016-07-14T01:34:13+5:30

या जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी बुधवारी आठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेला होता.

Work of Gram Panchayat workers in Palghar district | ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे काम पालघर जिल्ह्यात बंद

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे काम पालघर जिल्ह्यात बंद

Next

पालघर : या जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी बुधवारी आठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेला होता.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कर्मचाऱ्यांनी पालघरच्या जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेला. यावेळी पालघर तालुक्याचे दीपक मोरे, वाडयाचे मुकेश गायकवाड, तलासरीचे जितेंद्र वरठा, वसईचे दर्शन वर्तक, मोखाडयाचे भगत, विक्र्रमगडचे नाईक, डहाणूचे छोटू मराठे हे उपस्थित होते. या मोर्चाला बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे सुरेश जाधव, सेनेचे जगदीश धोडी, सचीन लोखंडे इ. नी आपला पाठिंबा जाहीर केला.
कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून कर्मचाऱ्यांना किमान वेतनपेक्षाही कमी वेतन मिळले असून ५० टक्यापेक्षाही जास्त ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांवर वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. या संदर्भात न्यायालयाने निर्देश देउनही कार्यवाही होन नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शर्तीवर नैमित्तिक रजा दिली जाते. तेवढीच रजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याची तरतूद असताना ती दिली जात नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रपत्र भरणे आवश्यक असताना ते भरले जात नाही. तसेच कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक भरून ते अद्ययावत केले जात नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचा भरणा केला जात नाही. इ. बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाबरोबर जिल्हापरिषद व गटविकास अधिकाऱ्यांनी कॅलेंडर वर्षात घ्यावयाच्या सभाबाबत प्रतिसाद दिला जाईल. आकृतीबंधाप्रमाणे वेतन देणे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत जिल्हापरिषद प्रशासन सकारत्मक निर्णय घेईल असे निधी चौधरी यांनी या दरम्यान सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Work of Gram Panchayat workers in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.