हितेन नाईक।पालघर : समुद्रात सुमारे ६० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा दिला असला तरी सातपाटी, मुरबे, डहाणू इ. भागातील सुमारे २०० मच्छिमारी नौका सुमारे ९० नॉटिकल मैलावर अडकून पडल्या असून मुसळधार पाऊस आणि वादळी वा-याचा वेग वाढल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.जिल्ह्यातील नायगाव ते झाई बोर्डी अशा सुमारे ११० किमी दरम्यान वसई, अर्नाळा, नायगाव, दातीवरे, कोरे, एडवण, केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्च्छेळी-दांडी, घिवली, धा.डहाणू, डहाणू, बोर्डी इ.भागातून सुमारे दीड ते दोन हजार लहान- मोठ्या मच्छिमारी नौका समुद्रात मासेमारी करीत आहेत. सोमवारी संध्याकाळपासून समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पश्चिमेकडून दक्षिणेच्या दिशेने ४५ ते ६० प्रति तास किलोमीटरच्या वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा हवामान खात्यासह मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून आंजर्ले खाडीत तीन बोटींना जलसमाधी मिळाली आहे. त्यातील मच्छीमारांनी सुरक्षित किनारा गाठला असला तरी ४-५ दिवसापूर्वी समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व नौकांनी आपल्या बंदरात अथवा जवळच्या बंदरात सुरक्षित आश्रय घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिला आहे. गुजरात राज्यातील सुमारे ७०० ते १ हजार ट्रॉलर्सनी प्रशासनाच्या इशाºयानंतर सुरक्षितपणे जयगड बंदर गाठल्याची माहिती गुजरातच्या बोटीवर काम करणारे मच्छीमार कमलेश यांनी लोकमतला दिली.सातपाटी हे जिल्ह्यातील एक प्रगतिशील बंदर असून सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्था व सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्था मधून अनुक्र मे १४३ तर ९५ लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. यापैकी सुमारे २०० नौका तर जिल्ह्यातील ४०० ते ५०० नौका आजही समुद्रात अडकून पडल्या आहेत.समुद्रातील मासेमारी क्षेत्र कमी पडत असल्याने व माशांचा घसरलेला दर, मासेमारी साहित्य, डिझेलमध्ये झालेली दरवाढ ह्या पाशर््वभूमीवर समुद्रात ही पुरेसे मासे मिळत नसल्याच्या कारणाने ९० ते १०० नॉटिकल क्षेत्रातून परत रिकाम्या हाताने बंदरात परतणे मच्छीमाराना परवडत नाही. त्यामुळे नेहमीच वादळी वाºयाशी खेळणारे हे मच्छीमार अशा वादळी परिस्थितीत आपल्या बंदरात परत येण्यास तयार नसतात. बोटीतील लोयली( अँकर)समुद्रात टाकून या बोटी शांतपणे एकाच जागेवर उभ्या ठेवल्या जातात. प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या इशाºयानंतर घरातील वायरलेस सेटद्वारे प्रत्येक कुटुंब आपापल्या बोटीतील वायरलेस सेट द्वारे संपर्क साधून खुशाली विचारीत असतो.मात्र आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरु वात झाल्याने वायरलेस वरून संपर्क तुटल्याचे मच्छीमारांनी सांगितले. मात्र येत्या ७२ तासात मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयाचा इशारा दिल्याने किनारपट्टीवरील गावात चिंतेचे वातावरण आहे.>प्रशासन कोस्टगार्डच्या संपर्कांतनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे हे स्वत: या घटनांकडे लक्ष ठेवून असून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क साधून या मच्छीमारांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून कोस्टगार्डशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांशी वायरलेस वरून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न मी करीत असून त्यांना तात्काळ जवळचा सुरक्षित किनारा गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.- संतोष मेहेर, चेअरमन, मच्छीमार संस्था
खवळलेल्या सागरात नौका अडकल्या, २०० नौका व त्यावरील शेकडो मच्छीमारांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:58 AM