पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२० करिता प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५७ तर आठही पंचायत समित्यांची एकूण सदस्यसंख्या ११४ असणार आहे.
या जिल्हा परिषदेची मुदत पुढील वर्षी १७ फेब्रुवारीला आणि त्या अंतर्गत येणाºया तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या पंचायत समित्यांची मुदत १५ फेब्रुवारीला संपणार असून त्यापूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे बंधनकारक आहे. याकरिता पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या २०११ च्या जनगणनेवर आधारित जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार एकूण सदस्य संख्येची पंचायत समिती क्षेत्रनिहाय विभागणी, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा आणि त्यांचे आरक्षण निश्चितीचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव ३० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या प्रस्तावास ५ नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देणे अपेक्षित आहे. ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेकरिता जिल्हाधिकारी आणि १३ नोव्हेंबर रोजी त्या - त्या पंचायत समितीसाठी तहसीलदार काढतील. १३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करतील.तालुकानिहाय जिल्हा परिषदेची सदस्य संख्यातालुका जि. प. पं. स.तलासरी 0५ १०विक्र मगड 0५ १०जव्हार 0४ 0८वसई 0४ 0८डहाणू १३ २६वाडा 0६ १२पालघर १७ ३४मोखाडा 0३ 0६