वाशिम जिल्ह्यात १.१० लाख बालकांना पोलिओ डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 06:32 PM2021-02-03T18:32:01+5:302021-02-03T18:32:08+5:30

Washim News ३ फेब्रुवारीपर्यंत १.२० लाखांपैकी १.१० लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला.

1.10 lakh children get polio dose in Washim district | वाशिम जिल्ह्यात १.१० लाख बालकांना पोलिओ डोस !

वाशिम जिल्ह्यात १.१० लाख बालकांना पोलिओ डोस !

Next

वाशिम  : जिल्ह्यात ३१ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, ३ फेब्रुवारीपर्यंत १.२० लाखांपैकी १.१० लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. बुथवर न आलेल्या ग्रामीण भागातील बालकांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिओचा डोस दिला जाणार आहे.
जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी ० ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख २० हजार ७९९ पैकी एक लाख सात हजार ६६७  बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. बुथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागामध्ये २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान आणि शहरी भागामध्ये २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान घरोघरी जावून सर्वेक्षण केले जात आहे. याकरिता ग्रामीण भागात १६३४ तर शहरी भागात ८१ असे एकूण १ हजार ७१५ चमू कार्यरत आहेत. दोन दिवसात जवळपास तीन हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. वीट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २२ व शहरी भागात ८ अशा एकूण ३० मोबाईल टीम कार्यरत आहेत.

 
जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी बुथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागात २ ते ४ फेब्रुवारी आणि शहरी भागात २ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील ज्या बालकांना अद्याप पोलिओ डोस मिळाला नसेल तर पालकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
 

Web Title: 1.10 lakh children get polio dose in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.