वाशिम : इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या तथा शाळेपासून ५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थीनींना मानव विकास मिशनमधून सायकलसाठी निधी दिला जातो. त्यानुसार, २०१७-१८ मध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड आणि मानोरा या चार तालुक्यांमधील १३८१ विद्यार्थीनींना सायकलसाठी प्रत्येकी ३ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याची एकत्रित रक्कम ४१ लाख ४३ हजार रुपये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात मार्चअखेर वर्ग करण्यात आल्याची माहिती मानव विकास मिशनच्या रेखा गुरव यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गत चार तालुक्यांचा समावेश असून शासनाच्या निर्देशानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध स्वरूपातील उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी मागासलेल्या तालुक्यांमधील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थीनींना सायकलचा लाभ दिला जातो. यासंदर्भातील निधी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर आणि तेथून थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यासाठी ४१ लाख ४३ हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील ४०७ विद्यार्थीनींना १२ लाख २१ हजार, मालेगाव तालुक्यातील ८७ विद्यार्थीनींना २ लाख ६१ हजार, रिसोड तालुक्यातील २२६ विद्यार्थीनींना ६ लाख ७८ हजार आणि मानोरा तालुक्यातील ६६१ विद्यार्थीनींना १९ लाख ८३ हजार रुपयांची तरतूद असल्याची माहिती गुरव यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील १,३८१ विद्यार्थीनींना मिळणार सायकल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:18 PM
वाशिम : इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या तथा शाळेपासून ५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्य करणाºया विद्यार्थीनींना मानव विकास मिशनमधून सायकलसाठी निधी दिला जातो.
ठळक मुद्देआठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थीनींना सायकलचा लाभ दिला जातो. निधी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर आणि तेथून थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यात जमा केला जातो.४१ लाख ४३ हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे.