शालेय गणवेश खरेदीसाठी मिळाले १.७१ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:57+5:302021-03-23T04:43:57+5:30

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७५; तर नगर परिषदेच्या ४३ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शालेय ...

1.71 crore for purchase of school uniforms! | शालेय गणवेश खरेदीसाठी मिळाले १.७१ कोटी!

शालेय गणवेश खरेदीसाठी मिळाले १.७१ कोटी!

Next

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७५; तर नगर परिषदेच्या ४३ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शालेय गणवेश मोफत स्वरूपात पुरविले जातात. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे शासनाकडून निधी दिला जातो. त्यानुसार, साधारणत: ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची गरज होती; परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गतवर्षी शाळाच सुरू झाल्या नसल्याने प्रत्येकी एका गणवेशासाठी १.७१ कोटींचा निधी शासनस्तरावरून जिल्हा परिषदेला देण्यात आला. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचे अधिकार असून ही प्रक्रिया सध्या सुरळित सुरू असल्याची माहिती आहे.

...............

७७५

जि.प.च्या एकूण शाळा

६६,८१३

एकूण विद्यार्थी

३३,१३६

मुले

३३,६७७

मुली

.................

५५,०००

लागणारे गणवेश

..........

१ कोटी ७१ लाख

जि.प.ला निधी प्राप्त

.......................

मुख्याध्यापकांची धावपळ

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शालेय गणवेश खरेदीकरिता ५० टक्केच निधी मिळाला. त्यातून चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापकांची सध्या धावपळ सुरू आहे.

गावोगावच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी ठराव घेऊन गणवेश खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून त्यास कोणाचाही विरोध असल्याचा प्रकार आतापर्यंत घडलेला नाही.

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ७७५ शाळांमध्ये शिकत असलेल्या ६६ हजार ८१३ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश मोफत स्वरूपात दिला जाणार असून मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया सुरळितपणे राबविण्यात येत आहे.

...............................

कोट :

गणवेशांकरिता मिळणारा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार दर्जेदारच गणवेश खरेदी करावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेवर शिक्षण सभापती या नात्याने विशेष लक्ष ठेवून आहे.

- चक्रधर गोटे

शिक्षण सभापती, जि.प., वाशिम

................

शालेय गणवेश खरेदीसाठी मिळालेल्या निधीतून प्रक्रिया सुरळितपणे राबविण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांकडूनही याकामी सहकार्य मिळत असून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गणवेश मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- विजय मनवर

मुख्याध्यापक

Web Title: 1.71 crore for purchase of school uniforms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.