यावर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेच्या उंबर्डा बाजार शाखेने खरीप हंगाम लक्षात घेता पुढाकार घेतल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उंबर्डाबाजार सेवा सहकारी सोसायटीच्या ९३ सभासदांना ६४ लाख ६१ हजार रुपये, दुघोरा सेवा सहकारी सोसायटीच्या ५२ सभासदांना ३५ लाख ३० हजार रुपये, सुकळी सेवा सहकारी सोसायटीच्या ३१ सभासदांना ३४ लाख ५१ हजार रुपये तथा लोणी सेवा सहकारी सोसायटीच्या ६६ सभासदांना ४६ लाख ३४ हजार रुपये असे एकूण ४ सेवा सहकारी सोसायटीच्या २४२ सभासदांना १ कोटी ८० लाख ७६ हजार रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले.
शेतकरी बांधवाचे पीक कर्ज मंजुरीसाठी उंबर्डा बाजार सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव हळदे यांनी पुढाकार घेऊन शाखाधिकारी एस. ए. भाकरे, रोखपाल अजय ताथोड, गटसचिव धनराज हळदे (उंबर्डा बाजार), राहुल वानखडे (दुघोरा) तथा ठाकरे (लोणी) यांनी परिश्रम घेतले.