कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:44 PM2019-11-24T17:44:01+5:302019-11-24T17:44:11+5:30

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे.

21 farmers commit suicide in 11 months in Karanja taluka | कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असून, गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अर्थात महिन्याला दोन शेतकरी आत्महत्याकारंजा तालुक्यात घडत असल्याचे स्पष्ट होत असून, या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी १० पात्र, ६ अपात्र ठरल्या, तर ५ त्रुटीच्या फेºयात अडकल्याचे प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. 
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असून, अगदी हातातोंडाशी आलेली पिकेही नैसर्गिक आपत्तीमुळे हातून जात असल्याने शेतकरी संकटात फसत चालला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असतानाच घराचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसत आहे. त्यात एकट्या कारंजा तालुक्यात १३ जानेवारी २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधित २१ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शासनाच्या वतीने पात्र शेतकरी आत्महत्येस १ लाख रूपयांचे अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत कारंजा तालुक्यात ११ महिन्यात झालेल्या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी आतापर्यंत केवळ १० शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ६ अपात्र ठरल्या तर ५ प्रकरणे अद्यापही त्रुटींमुळे प्रशासन दरबारी पडून आहेत. कारंजा तालुक्यात ११ महिन्यांत जय शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले त्यापैकी रामकृष्ण विठ्ठल हुमने रा. धोत्रा देशमुख, अंबादास चंद्रभान कंगाले रा. भामदेवी, जगन्नाथ गोरखाजी गाडेकर रा. येवता, गजानन कमलाकर शिंदे रा शिवनगर, नारायण गोविंदराव बिल्लेवार रा. धनज बु., रामहरी नारायण उपाध्ये रा. काजळेश्वर, रविंद्र नागोराव पाडे रा. येवता, मोहम्मद वहिद मो. शफी रा. कारंजा, रविंद्र रामदास राठोड रा. महागाव व रूपराव दिनकर शिंदे रा खेर्डा खु. या शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय व प्रशासकीय निकषात पात्र ठरल्या तर ज्ञानेश्वर भिका सावळे, नितीन सुरेश भोयर, किशोर रामराव राऊत, विलास बाजीराव कापसे, संतोष यशवंत लव्हाळे व देवराव सदाशिव शेळके या ६ शेतकºयांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या. गणेश उंकडा वानखडे रा. विरगव्हाण, गजानन लुंगाजी रंगे रा. वडगाव रंगे, कुसुम सुधाकर बेलखेडे रा. बेलखेड, श्रीकृष्ण रंगराव पुंड रा. दुघोरा  व अवधुत झिंगराजी इंगळे रा. खानापूर या ५ शेतकºयांच्या आत्महत्येची प्रकरणे त्रुटीमुळे प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत.

Web Title: 21 farmers commit suicide in 11 months in Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.