वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात ९९ विद्यार्थी शेतकरी कुटूंबातील असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. शालेय बाल आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षात जिल्ह्यातील वाशिम-२१२, रिसोड-१७७, मालेगाव-१६७, मंगरुळपीर-१७१, मानोरा-१८२; तर कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाºया १९६ आणि नगर परिषद हद्दीत येणाºया ४३ अशा एकंदरित ११५१ शाळांमधील १ लाख ९८ हजार ३६२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गेल्या चार वर्षात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी ९८० विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ६६२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय आवश्यकता असणाºया २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील २१० शालेय विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 4:18 PM
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले.
ठळक मुद्देतपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ल्या चार वर्षात किरकोळ शस्त्रक्रियेसाठी ९८० विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ६६२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.