सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्रासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:13 PM2020-09-11T12:13:15+5:302020-09-11T12:13:42+5:30

तात्पुरत्या स्वरूपात ‘आत्मा’ कार्यालयाच्या सभागृहात विक्री व्यवस्था करण्यात येत आहे.

2.50 crore proposal for sales center for organic vegetables | सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्रासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव 

सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्रासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव 

Next

वाशिम: शासन निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रीय भाजीपाला आणि रानभाज्या विक्री केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात वाशिम येथे कृषी विभाग आत्मातर्फे सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव कृषी उपसंचालकांमार्फत जिल्हा नियोजन अधिकाºयांकडे गत आठवड्यात पाठविण्यात आला. तात्पुरत्या स्वरूपात ‘आत्मा’ कार्यालयाच्या सभागृहात विक्री व्यवस्था करण्यात येत आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व भारतीय प्राकृतिक शेती पध्दती या योजनेतील सेंद्रिय शेतकरी गटांनी जिल्ह्यात सेंद्रिय/जैविक पध्दतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, अन्यधान्य, कडधान्य, दुध, गावरान अंडी आदिंचे उत्पादन थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीचे नियोजन प्रकल्प संचालक, आत्मा यांनी केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर विक्री केंद्राची स्थापना केली जाणार आहे. आत्मा कार्यालयातर्फे ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी शेतकरी गटांची नोंदणी केली आहे. त्यासाठीच कृषी उपसंचालकांमार्फत जिल्हा नियोजन अधिकाºयांकडे केंद्र स्थापनेसह इतर सोयीसाठी २.५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास किमान ५ महिने लागतील. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आत्मा’च्या कक्षात रानभाज्या आणि सेंद्रीय भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.


सेंद्रीय भाजीपाला, रानभाज्या विक्रीसाठी केंद्र स्थापन्याच्या उद्देशाने २.५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत वाशिम शहरातील नागरिकांसाठी रानभाज्या, सेंद्रिय भाजीपाला, फळभाज्या, डाळी व धान्य खरेदीची सुविधा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे केली आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून हे केंद्र सुरू होईल. सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्रास भेट देवून खरेदी करावी.
- एस.एम.तोटावार
प्रकल्प संचालक ‘आत्मा’ तथा जिलहा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम

Web Title: 2.50 crore proposal for sales center for organic vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.