मध्यवर्तीच्या २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान 

By दिनेश पठाडे | Published: September 16, 2022 04:09 PM2022-09-16T16:09:02+5:302022-09-16T16:09:33+5:30

वाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी बँक स्तरावरुन यादी बनविण्याचे काम ...

26 thousand central farmers will get incentive subsidy | मध्यवर्तीच्या २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान 

मध्यवर्तीच्या २६ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान 

Next

वाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी बँक स्तरावरुन यादी बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान,  दि.अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४२३ संस्थामधील २६ हजार ६६९ शेतकरी या अनुदानासाठी पात्र असून त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९३ हजारावर शेतकºयांच्या खात्यात ५८७ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. आता महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या याद्या तयार करण्याचे काम बँकांकडून गत काही दिवसांपासून सुरु आहे. १६ सप्टेंबर पर्यंत मध्यवर्ती बँकेच्या २६६६९ खातेदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.  या योजनेत पात्र असणाºयांना आधार लिंकिंग करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विशिष्ट क्रमांक आल्यावर लगेच खात्यात रक्कम जमा होण्यास मदत होईल. सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली असल्यास जास्तीत जास्त ५० हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. अल्पमुदती पीककर्ज ५० हजारापेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या मुद्दल रक्कमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: 26 thousand central farmers will get incentive subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी