२७ दुर्धर आजारग्रस्तांना मिळणार अर्थसहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:41 PM2021-02-02T17:41:38+5:302021-02-02T17:41:47+5:30

Washim ZP News सभेत प्राप्त् ३१ प्रस्तावांपैकी २७ प्रस्ताव मंजू करण्यात आले तर निकषात न बसल्याने चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले.

27 critically ill to get financial assistance | २७ दुर्धर आजारग्रस्तांना मिळणार अर्थसहाय्य !

२७ दुर्धर आजारग्रस्तांना मिळणार अर्थसहाय्य !

Next


वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पिडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येक १५ हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. सन २०२० या वर्षात प्राप्त ३१ पैकी २७ प्रस्ताव मंजूर झाल्याने दुर्धर आजारग्रस्तांना लवकरच १५ हजाराचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
ग्रामीण भागातील हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पिडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता अर्थसहाय्य मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १५ हजाराची तरतूद केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लाभार्थींचे प्रस्ताव स्विकारण्यात येतात. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३१ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती होती. या सभेत प्राप्त् ३१ प्रस्तावांपैकी २७ प्रस्ताव मंजू करण्यात आले तर निकषात न बसल्याने चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २७ दुर्धर आजारग्रस्तांना प्र्रत्येकी १५ हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर केले असून, एकूण चार लाख पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हयातील दुर्धर आजाराने पिडित असलेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.

Web Title: 27 critically ill to get financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.