वाशिम: तंत्रनिकेतनच्या प्रवेशाची दुसरी फेरी ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान पार पडली. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३९२ जणांना अलॉटमेंट देण्यात आले. त्यातील २८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर इतरांनी बेटरमेंटचा पर्याय स्वीकारला. वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या तंत्रनिकेतनमध्ये विविध ६ शाखा उपलब्ध आहेत. प्रत्येक शाखेसाठी प्रवेशाची क्षमता ६९ एवढी आहे. एकूण ४१४ जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीत ३६० विद्यार्थ्यांपैकी ३५६ जणांना अलॉटमेंट देण्यात आले होते. त्यातील १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
यावेळी बेटरमेंटचा पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी नोंदणी केली होती. दुसऱ्या फेरीत देखील विद्यार्थ्यांनी आयटी, सिव्हील इलेक्ट्रीक या शाखांना अधिक पसंती दिली. तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून नोकरी करण्याची संधी असते. शिवाय स्वत:चा व्यवसाय देखील उभारता येऊ शकतो. तंत्रनिकेतन केल्यानंतर करिअरसाठी विविध पर्याय असल्याने विद्यार्थ्यांचा कल तंत्रनिकेतनकडे वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या पहिल्या व दुसऱ्या फेरीतच प्रवेशाचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. प्रवेशासाठी चार फेऱ्या होणार आहेत. तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली आहे. प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी चौथी अर्थात समुपदेशन फेरी पार पडणार आहे.
३९२ जणांना अलॉटमेंटवाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दुसºया फेरीत ३९२ जणांना अलॉटमेंट मिळाले. यातील २८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून काहींनी बेटरमेंटचा पर्याय स्वीकारला आहे.
कोणत्या शाखेला किती प्रवेश
मेकॅनिक | ४३ |
सिव्हील | ५५ |
आयटी | ५९ |
इलेक्ट्रीकल | ५१ |
इलेक्ट्रॉनिक | ४३ |
ऑटोमोबाईल | ३० |