रस्ते कामांसाठी ३२ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:45 AM2021-04-28T04:45:05+5:302021-04-28T04:45:05+5:30
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाशीम जिल्ह्याला झुकते माप देत सीआरआयएफची ३२ कोटीची रूपयांची कामे मंजुर करून ...
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाशीम जिल्ह्याला झुकते माप देत सीआरआयएफची ३२ कोटीची रूपयांची कामे मंजुर करून वाशीम जिल्ह्याच्या रस्त्यांबाबत निधी उपलब्ध करून दिला अशी माहिती खासदार भावना गवली यांनी २७ एप्रिल रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
केंद्रीय मंत्री गडकरी यांचा जिल्ह्याच्या विकासासाठी कायम मदतीचा हात राहीलेला असून सदर रस्ता विकास कामा बाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. गडकरी यांनी जिल्ह्याला भरभरून निधी देवून असे आश्वासीत केले होते. सदरची कामे सीआरआयएफ मधून दिल्या गेली असून या माध्यमातून खराब झालेले रस्ते सुद्धा दुरूस्त होणार आहे. ९० टक्के रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडुन व उर्वरीत रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची विनंती नामदार गडकरी यांना केली होती. मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यासह नामदार गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उर्वरीत रस्ते करण्यासंदर्भातील निवेदन दिले होते. रिसोड शहरातील रस्त्यासह जिल्ह्यातील कारंजा,मानोरा व वाशीम या तालुक्यातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत कामांना मंजुरात दिली. यामध्ये सोनाटी,गोंडाळा, मांगुलझनक,गोवर्धन, पारडी,
बेलखेड,रिसोड शिरपूर-करंजी,तामशी, वाशीम,कारंजा धनज रोड,आमगव्हाण ते भोयणी फाटा तालुका मानोरा या रस्त्याचा समावेश आहे.