वाशिम तालुक्यातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी ३८ लक्ष निधी मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:20 PM2017-11-10T23:20:46+5:302017-11-10T23:21:59+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीला तांडा वस्ती सुधर योजनेंतर्गंत ३८ लक्ष रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गंत सिमेंट रस्त्यासाठी देगाव उमरा कापसे५ लक्ष, जांभरुण परांडे ३ लक्ष, अनसिंग ५ लक्ष, देपूळ ५ लक्ष, भोयता ४ लक्ष रुपये तर पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी दुधखेडा, कोंडाळा महाली प्रत्येक ५ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. तोंडगाव व पांडवउमरा सभागृहासाठी प्रत्येकी ५ लक्ष रुपये असा एकूण ३८ लक्ष रुपयांचा समावेश आहे. या निधीला सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग वाशिमने २२ आॅगस्ट २०१७ च्या आदेशान्वये मंजुरात दिली आहे. पंचायत समितीला तसे पत्र प्राप्त झाले असून या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच या नऊही ग्रामपंचायतची कामे मंजुर झाली असून यासाठी सुनिल राठोड महाराज अध्यक्ष तांडा वस्ती सुधार योजना वाशिमयांचे प्रयत्न लाभले.