शेलू ग्रामपंचायतच्या निवडणुकीत १३ जागांसाठी ४० उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:42+5:302021-01-08T06:11:42+5:30
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ग्रामपंचायतचा समावेश असून, या ...
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ग्रामपंचायतचा समावेश असून, या ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसाअखेर ४० उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात प्रभाग क्र.१ मध्ये सर्वसाधारण जागेसाठी रवि लांभाडे, महावीर तोडरवाल, रजनीश कर्नावट, शेख हनीफ शेख रऊफ, उमेश बोबडे., ना.मा.प्र.जागेसाठी इंदूबाई पानभरे, ज्योती लांभाडे, सर्वसाधारण महिलांसाठी स्नेहल शेळके, प्रमिला पवार, सोनू काटकर. प्रभाग क्र.२ सर्वसाधारण जागेसाठी शाह असलम शाह रुस्तम शाह, कलावती चक्रनारायण, शाहरूख मनवर खान, श्यामसुंदर अग्रवाल, ना.मा.प्र.जागेसाठी रेणुकाबाई वैद्य, तमिजाबी हुसेन शाह, संपदा राऊत, प्रभाग क्र.३ सर्वसाधारण जागेसाठी चंद्रकांत भि.ठाकरे, सुनील हरणे, प्रवीण चव्हाण, हितेश वाडेकर, सर्वसाधारण महिला जागेसाठी शुभांगी अरबाड, श्रद्धा राऊत, प्रभाग क्र.४ अ.जातीसाठी अनिल गवई, सदानंद चक्रनारायण, अजय परसे, ना.मा.प्र. जागेसाठी प्रकाश अपूर्वा, सुशील अपूर्वा, किशोर गाडगे, रिहान शाह बब्बू शाह, सर्वसाधारण महिला जागेसाठी खान शहीदाबी वलायतखान, मोहम्मद हमीदाबी फारूख मोहम्मद, प्रभाग क्र.५ ना.मा.प्र.जागेसाठी जयकुमार गुप्ता, संतोष लांभाडे, अ.जा. महिला जागेसाठी आशा खंडारे, मंगला परसे, मीरा परसे, सर्वसाधारण महिला जागेसाठी शाह मालनबी कासमशाह, कविता राठी, मंदा लांभाडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.
---------
गतवेळचा एकही उमेदवार रिंगणात नाही.
शेलूबाजार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवारांनी यापूर्वी निवडणूक लढविली असली तरी, गतपंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या एकाही उमेदवाराने यंदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जच दाखल केलेला नाही. जिल्ह्यात असा प्रकार केवळ शेलूबाजार ग्रामपंचायत अंतर्गतच घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, गतवेळचा एकही उमेदवार रिंगणात का नाही, याबाबत ग्रामस्थ मतदारांत चर्चेला उधाण आले आहे.