----------------------
पोहरादेवीत कोरोना चाचणी
वाशिम: बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीत कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावत आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने घरोघर फिरून संदिग्धांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. आठवडाभरात १००पेक्षा अधिक लोकांची चाचणी यात करण्यात आली.
----------------------
कोविड केअर सेंटरमधील जेवण निकृष्ट
वाशिम: वाशिम तालुक्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याच्या तक्रारी या सेंटरमध्ये दाखल व्यक्तींनी रविवारी भ्रमणध्वनीवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
----------------------
कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज वाढले
वाशिम : अर्ज एक योजना अनेक या अंतर्गत महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनंतर कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन दिवसांत ६०० शेतकऱ्यांनी यात अर्ज केले.
---------------------
लॉकडाऊनच्या आदेशाची अफवा
वाशिम: जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून लागू केलेल्या आदेशाला २२ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तथापि, पूर्वीप्रमाणेच सायंकाळी ५ नंतर संचारबंदीचे आदेश असताना, १६ मार्चपासून कठोर लॉकडाऊन लागण्याची अफवा जिल्ह्यात पसरत आहे.