जिल्ह्यातील तब्बल ६४ प्रकल्प तुडूंब!
By admin | Published: October 15, 2016 02:40 AM2016-10-15T02:40:05+5:302016-10-15T02:40:05+5:30
वाशिम जिल्ह्यातील १२५ पैकी ७८ प्रकल्प तुडुंब; वाशिम तालुक्यातील सर्वाधिक २४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
वाशिम, दि. १४- गत आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरी दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन करून सर्वांंंंंनाच सुखद धक्का दिला. गत आठवड्यात परतीच्या दमदार पावसानेही सर्वांंंंंचीच धांदल उडविली. दुसरीकडे परतीच्या याच पावसाने प्रकल्पांत समाधानकारक जलसाठा झाला. जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प आहेत. परतीच्या पावसामुळे तब्बल ६४ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, ७८ प्रकल्प १00 टक्के भरले आहेत. ७५ ते ९९ टक्के जलसाठा असणार्या प्रकल्पांची संख्या १३ आहे. २५ टक्क्याखाली जलसाठा असणार्या प्रकल्पाची संख्या केवळ एक आहे. २५ ते ५0 टक्क्याच्या दरम्यान जलसाठा असणार्या प्रकल्पांची एकूण संख्या १६ अशी आहे. ५0 ते ७५ टक्के जलसाठा असणार्या प्रकल्पांची संख्या १७ अशी आहे.
वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, अनसिंग, बोराळा, धुमका, कार्ली, खंडाळा, सावंगा, शिरपुटी, उमरा कापसे, उमरा शम., वाईसावळी, वारला, शेलु खुर्द, वारा जहागीर, अडगाव बॅरेज, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण बॅरेज असे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ, मैराळडोह, सोनल, रिसोड तालुक्यातील गणेशपूर, वरूड बॅरेज प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा, मोहरी, पिंप्री खु., सावरगाव, सिंगडोह, दस्तापूर, सार्सीबोथ २, कासोळा, चांदई, मानोरा तालुक्यातील आमदरी, आसोला गव्हा, आसोला इंगोले, बोरव्हा, चिखली, चौसाळा, फुलउमरी, गारटेक, गिद, गिरोली, कार्ली, पंचाळा, रतनवाडी, रूई, वाईगौळ, वाठोद, गोंडेगाव तर कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे, मोखेड पिंप्री, शहा, झोडगा, उंद्री, बेलमंडळ, बग्गी, येवता, मोहगव्हाण आदी प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.