वाशिम  जिल्ह्यात १८ दिवसांत ८९ कोटींचे पीककर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:58 PM2018-04-21T17:58:05+5:302018-04-21T17:58:05+5:30

89 Crore crop loan distrubuted In 18 Days In Washim District | वाशिम  जिल्ह्यात १८ दिवसांत ८९ कोटींचे पीककर्ज वितरण

वाशिम  जिल्ह्यात १८ दिवसांत ८९ कोटींचे पीककर्ज वितरण

Next
ठळक मुद्देअवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे.अद्यापही पीककर्जाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम असून, कर्जमाफीच्या निकषाने हा गोंधळ उडत आहे.


वाशिम : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. 
यंदा वाशिम जिल्ह्यात  १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  गतवर्षी अर्थात २०१६ च्या खरीप हंगामामध्ये प्रशासनाने ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बाळगले होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात ८९० कोटी रुपये वाटप झाला होता. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत अर्थात १५ जुलै २०१७ पर्यंत केवळ ३१० कोटी रुपयेच (२७ टक्के) कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होते. यंदाा राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºयाा सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी माफ केले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सद्या कर्जमुक्त झाले आहेत. दरम्यान, अद्यापही पीककर्जाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम असून, कर्जमाफीच्या निकषाने हा गोंधळ उडत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना पीककर्ज वितरण आणि पीककर्ज माफीबाबत शेतकºयांना विस्तृत मार्गदर्शन करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात पीककर्ज वितरण प्रक्रियेने वेग घेतला आहे. या अंतर्गत गत १८ दिवसांतच जिल्ह्यातील ७८४७ शेतकऱ्यांना ८९.२६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले.
 
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वाधिक वितरण
वाशिम जिल्ह्यात यंदा  १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्यानंतर पीककर्ज वितरण प्रक्रियेला सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बॅकेने सुरुवात केली. जिल्ह्यात १८ दिवसांत ७८४७ शेतकºयांना ८९.२६ कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले असले तरी, यात सर्वाधिक वाटा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे. या बँकेच्यावतीने एकट्या वाशिम तालुक्यात १४८५ शेतकऱ्यांना १३.५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले.

Web Title: 89 Crore crop loan distrubuted In 18 Days In Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.