जिल्ह्यात ९,५८३ कोरोना योध्द्‌यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:54+5:302021-05-15T04:39:54+5:30

जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवक, १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्स, १ लाख ४० हजार ३४ ज्येष्ठ नागरिक आणि ...

9,583 Corona warriors await second dose in district | जिल्ह्यात ९,५८३ कोरोना योध्द्‌यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा!

जिल्ह्यात ९,५८३ कोरोना योध्द्‌यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा!

Next

जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवक, १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्स, १ लाख ४० हजार ३४ ज्येष्ठ नागरिक आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १० हजार नागरिक अशा एकूण १ लाख ७० हजार २२६ जणांची लसीकरणासाठी १३ मे पर्यंत अधिकृत नोंदणी केलेली आहे. त्यापैकी १ लाख ५९ हजार ९९१ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ३२ हजार ३२४ जणांना दुसरा डोस मिळालेला आहे; तर १ लाख २७ हजार ६६७ जण अद्याप दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. त्यात ९ हजार ८२ कोरोना योध्द्यांचाही समावेश आहे.

..................................

किती लसीकरण?

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्यसेवक - ६७७५/३८०५

फ्रंटलाईन वर्कर्स - ११८६०/५२७७

ज्येष्ठ नागरिक - १३४०३६/२३२४२

१४-४४ वयोगट - ७३२०/००

................

बॉक्स -

एकही डोस न घेणारे १५५७

जिल्ह्यात ७ हजार ७२५ आरोग्य सेवकांची लसीकरणासाठी नोंद केली होती; मात्र त्यातील ६ हजार ७७५ आरोग्य सेवकांनीच लसीचा पहिला डोस घेतला. ९५० जणांनी याबाबत उदासीनता दर्शविली. तसेच १२ हजार ४६७ फ्रंटलाईन वर्कर्सची नोंद झाली असताना ११ हजार ८६० जणांनी लस घेतली; तर ६०७ जणांनी याकडे पाठ फिरवली. यानुसार, एकही डोस न घेणारे १५५७ कोरोना योध्द्यांचा एकही डोस न घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Web Title: 9,583 Corona warriors await second dose in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.