टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; सुदैवाने चालक, क्लीनर बचावले
By दादाराव गायकवाड | Published: September 15, 2022 07:56 PM2022-09-15T19:56:36+5:302022-09-15T19:57:06+5:30
टायर फुटल्याने मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच १६१ ई वर मंगरुळपीर येथून वाशिमकडे गहू घेऊन येत असलेले वाहन मंगळवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास टायर फुटल्याने उलटले. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लीनर बचावले. तसेच या वाहनातील गव्हाची पोती रस्त्यावर पडल्याने गहू रस्त्यावर पसरला होता. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच १६१ ईवर मंगरुळपीर येथून एमएच ४०, सीडी ३१८१ क्रमांकाचे वाहन गहू घेऊन वाशिमकडे येत होते.
वाशिमकडे जात असलेल्या या मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर कळंबा फाट्यानजिक या वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहन रस्त्यावरच उलटले. यामुळे वाहनातील गव्हाची पोती रस्त्यावर पडल्याने गहू रस्त्यावर पसरला. सुदैवाने या भीषण अपघातानंतरही वाहन चालक व क्लीनर थोडक्यात बचावले. थोड्या वेळानंतर एका जेसीबीच्या मदतीने हे वाहन उभे करून रस्त्याच्या बाजूला नेण्यात आले.