------
पीककर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे
वाशिम: राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने, शेतकरी वारंवार पीककर्जासाठी बँकांची वाऱ्या करीत असल्याचे चित्र इंझोरी येथे शुक्रवारी पाहायला मिळाले.
--------------------
शेतकरी गटाला अनुदान देण्याची मागणी
काजळेश्वर: शासनाच्या ‘उन्नत शेती समृद्ध शेती’ या घोषणेनुसार शेती व्यवसाय करण्यास मदत व्हावी, म्हणून शासनाने काजळेश्वर येथील बळीराजा स्वयंसहायता शेतकरी गटास अनुदान द्यावे, अशी मागणी येथील शेतकरी एस.पी. उपाध्ये यांनी शुक्रवारी केली आहे.
---------------
मोहरी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती
वाशिम : ग्रामपंचायतकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत सोमवारी गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
---------
पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!
वाशिम: पारंपरिक पिके डावलून शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. मात्र, या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
-------------
आसेगावात जोरदार पाऊस
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे सोमवार २८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे शेतपिकांचे कुठलेही विशेष नुकसान झाले नाही. मात्र, टिनपत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.
------------
आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या प्रलंबित!
वाशिम : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, यासह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशासेविकांकडून गुरुवारी प्रशासनाकडे करण्यात आली.
--------------
गर्दी टाळण्याचे गावकऱ्यांना आवाहन
वाशिम: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व्हायला नको. ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी गावात होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन आसेगाव ग्रामपंचायतने गुरुवारी ग्रामस्थांना केले.