मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:38 AM2021-04-26T04:38:04+5:302021-04-26T04:38:04+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन सील केले जाणार आहे. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. तसे आढळल्यास नियमानुसार गुन्हाही दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर परिषद, पोलीस प्रशासनानेदेखील मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.