डीटीएड उत्तीर्ण युवकांना नोकरीत सामावून घ्या

By admin | Published: December 22, 2014 11:49 PM2014-12-22T23:49:52+5:302014-12-22T23:49:52+5:30

डीटीएडधारकांचे वाशिम जिल्हाधिका-यांना साकडे: सिईटी परिक्षा घेण्याची मागणी.

Adopt the DTE passed youth | डीटीएड उत्तीर्ण युवकांना नोकरीत सामावून घ्या

डीटीएड उत्तीर्ण युवकांना नोकरीत सामावून घ्या

Next

वाशिम : प्राथमिक शिक्षक पदविका परिक्षा उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार युवकांची शिक्षक पात्रता परिक्षा घेवून त्यांना शिक्षक पदावर नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी करीत जिल्ह्यातील डी.टी.एड. उत्तीर्ण बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यात जवळपास ४ ते ५ लाख डी.टी.एड. उत्तीर्ण झालेले बेरोजगार युवक व युवती आहेत. दरवर्षी या बेरोजगारीमध्ये भर पडत आहे. दुसरीकडे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सद्यस्थितीत भरपूर जागा रिक्त आहेत. परंतु राज्याचा शिक्षण विभाग या जागा भरण्यास विलंब लावत असल्यामुळे अनेक शाळांवर शिक्षकांची कमतरता आहे. व शिक्षक नसल्यामुळे अनेक ठिकाणी विद्याथ्यार्चे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांचे हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी डी.टी.एड. उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार युवकांची सि.ई.टी. परिक्षा घेऊन त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. यासंदर्भात शासनाने २0१0 मध्ये सि.ई.टी. परिक्षा घेवून पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ही परिक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे डी.टी.एड. उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढतच आहे. हे बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी सि.ई.टी. परिक्षा घेऊन त्यांच्यामधुन प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरुन बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा अशी मागणी युवकांनी केली आहे.

Web Title: Adopt the DTE passed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.