पहिल्याच पावसानंतर वाशिम जिल्ह्यात पेरणीची घाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:31 PM2019-06-23T16:31:59+5:302019-06-23T16:32:23+5:30

हिल्याच पावसानंतर रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसले.

After the first monsoon, the rush of sowing in Washim district | पहिल्याच पावसानंतर वाशिम जिल्ह्यात पेरणीची घाई 

पहिल्याच पावसानंतर वाशिम जिल्ह्यात पेरणीची घाई 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात शनिवारी पावसाचे दमदार आगमन झाले. या पहिल्याच पावसानंतर रविवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र दिसले. प्रत्यक्षात जमिनीत पाऊस मुरल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे; परंतु जुन महिना संपत असल्याने पेरणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीची घाई करीत असून, पावसाचा खंड पडल्यास ही पेरणी उलटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले; परंतु जुन महिना संपत आला तरी, जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलाच नाही. त्यात शनिवार २२ जुन रोजी प्रथमच पावसाने सार्वत्रिक हजेरी लावली. दुपारपासून सुरू झालेला पाऊस तास दोन तास बरसल्याचे काही भागांत दिसले. रात्रीच्या वेळेतही पावसाच्या तुरळक सरी बहुतांश भागात पडल्या. यामुळे शेतकरी उल्हासित झाले आणि काही शेतकºयांनी रविवारी पेरणीला सुरुवात केली. तथापि, या पावसामुळे जमीन ओली झाली असली तरी, उन्हाळ्यातील झालेली धूप भरून निघणेच शक्य नाही. अशात पावसाने खंड दिल्यास शेतकºयांनी पत्करलेली जोखीम त्यांना अडचणीत आणण्याचीही शक्यता आहे. यंदाच्या हंगामात मान्सून लांबल्याने खरीपाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कृषी विभागाने जमिनीत चांगला पाऊस मुरत नाही तोपर्यंत शेतकºयांनी पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले होते. त्याकडे शेतकरी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

बीबीएफ यंत्राचा वापर
पहिल्या पावसानंतर उल्हासित झालेल्या काही शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे. यात वाशिम तालुक्यातील देपुळसह परिसरात सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात झाल्याचे दिसून आले. ही पेरणी करताना कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकºयांनी पारंपरिक पद्धतीऐवजी ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा आधार घेतल्याचे दिसले. या प्रकारच्या पेरणीमुळे पावसाचे कमी आणि अधिक प्रमाण झाल्यावरही शेतकºयांना फारसे नुकसान होण्याची शक्यता नसते. त्यामुळेच शेतकºयांनी बीबीएफ यंत्राचा आधार घेतला आहे.

Web Title: After the first monsoon, the rush of sowing in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.