ग्रामसेवकाविरुद्ध ग्रा. पं. सदस्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:26+5:302021-02-06T05:17:26+5:30
निवेदनात म्हटले आहे की, सचिव व्यवहारे यांची कार्यालयातील वागणूक अतिशय उद्धटपणाची आहे , ते कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याशी अतिषय उद्धटपणे ...
निवेदनात म्हटले आहे की, सचिव व्यवहारे यांची कार्यालयातील वागणूक अतिशय उद्धटपणाची आहे , ते कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याशी अतिषय उद्धटपणे बोलतात , कार्यालयातील कामकाजाबाबत माहिती विचारली असता , कोणतीच माहिती सांगत नाहीत , तसेच ग्रा.पं. कार्यालयातील शासकीय कामे वेळेवर करत नाही , योजनांबाबत ग्रामपंचायत कार्यालयात तसेच गावकऱ्यांना माहिती देत नाहीत , तसेच ठरलेल्या वेळेवर कार्यालयात हजर राहत नाहीत . त्यांचे कामाबाबत आम्ही सर्व गावकरी , ग्रामपंचायत सदस्य त्रस्त झालो आहोत . त्यांना आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर या , असे म्हटले असता ऐकण्यास तयार नाहीत. सद्यस्थितीत शेलगाव ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले सचिव व्यवहारे यांचे उद्धटपणामुळे व कामामध्ये दिरंगाईमुळे त्यांची ग्रामपंचायत शेलगाव येथून त्वरित बदली होऊन आम्हांस योग्य सचिव देण्यात यावे अशी मागणी पद्मा भोयर यांनी केली आहे.