म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:31 AM2021-05-15T11:31:46+5:302021-05-15T11:32:03+5:30

Mucormycosis News : किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते.

Also a shortage of drugs for Mucormycosis; No injections! | म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना !

म्युकरमायकोसिसवरील औषधींचाही तुटवडा; इंजेक्शन मिळेना !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असताना, इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. अकोला, नागपूर येथून औषधी, इंजेक्शन आणावे लागत असून, निर्धारित किमतीपेक्षा जादा पैसे मोजावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाईकही हतबल होत असल्याचे दिसून येते.
कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. ११ मे रोजी एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. मुख, दात, डोळे आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकते. या आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर डाॅक्टरांकडे रुग्ण उपचारासाठी जात आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सर्वत्रच म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याने इंजेक्शन व औषधीचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात इंजेक्शन व औषधी उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना अकोला, नागपूर येथून इंजेक्शन, औषधी आणण्याची वेळ आली आहे. 


३० व्हायल हव्या, मिळतात दोन ते सहा

कोरोनापूर्वी जिल्ह्यात एक, दोन इंजेक्शनची गरज पडत होती. आता लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनच्या दररोज २० ते ३० व्हायल उपलब्ध असावे, असे डॉक्टरांना अपेक्षित आहे. मात्र, दोन ते सहा व्हायल मिळत असल्याने अनेक रुग्ण हे उपचारासाठी परजिल्ह्यात जात आहेत.


एका रुग्णाला लागतात ४५ डोस
nएका रुग्णाला दररोज तीन डोस याप्रमाणे दोन आठवड्यांपर्यंत इंजेक्शन, गोळ्या घ्याव्या लागतात. यासाठी किमान दीड लाख ते दोन लाखांपर्यंत खर्च येऊ शकताे. ल्ह्यात तुटवडा असल्याने काही जण अकोला व नागपूर येथून इंजेक्शन व औषधी मागवितात. काही ठिकाणी एमआरपीपेक्षा थोडी अधिक किंमत आकारतात.


घाबरून जाऊ नका, उपचार घ्या !
पोस्ट कोविडनंतर तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, अचानक दात हलणे, अशी लक्षणे आढळून आली तर रुग्णांनी घाबरून न जाता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
- डॉ. मंजूषा वराडे, दंतरोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम.

Web Title: Also a shortage of drugs for Mucormycosis; No injections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.