वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, ११ सप्टेंबर रोजी १०७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कोरोनाबाधितांची संख्या २५७६ वर पोहोचली आहे. दरम्यान शुक्रवारी १२६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. शुक्रवारी एकूण १०७ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, दंडे चौक परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, जुने बसस्थानक परिसरातील १, विनायक नगर परिसरातील १, काळे फाईल येथील १, लाखाळा परिसरातील २, विठ्ठलवाडी परिसरातील २, गणेशपेठ परिसरातील २, सेक्युरा हॉस्पिटल जवळील २, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, झाकलवाडी येथील १, कार्ली येथील १, शिरपुटी येथील ३, केकतउमरा येथील १, भटउमरा येथील ५, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, एचडीएफसी बँक परिसरातील १, व्यंकटेश नगर परिसरातील १, बेंदरवाडी परिसरातील १, पवारवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची २, मांडवा येथील ३, आसेगाव पेन येथील ५, महागाव येथील १, किनखेडा येथील १, गोवर्धन येथील १, हिवरा पेन येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २, रविदास नगर येथील १, इतर ठिकाणच्या २, मालेगाव शहरातील ९, कोयाळी येथील २, मैराळडोह येथील १, वडप येथील १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, अकोला रोड परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील १, कल्याणी नगर येथील २, मंगलधाम परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणच्या ७, सोनखास येथील १, शेलूबाजार येथील ७, जांभ येथील १, धामणी येथील १, आसेगाव येथील २, कासोळा येथील ३, दाभा येथील १, जनुना येथील १, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
१२६ जणांना डिस्चार्जशुक्रवारी जिल्ह्यातील १२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील २६, रिसोड शहरातील ३१, कारंजा शहरातील २३, मंगरुळपीर तालुकयतील ४३ जणांसह ग्रामीण भागातील व्यक्तींचा समावेश आहे.