उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. गावात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण निघत असल्याने प्रशासनाच्या वतीने संपूर्ण गाव सील करणे अपेक्षित होते. मात्र तसे करण्यात न आल्याने गावातील अनेक नागरिक गावाबाहेर पडत आहेत तर इतर गावांतील नागरिक सुद्धा खुलेआम गावात येत असल्याने कोरोना संक्रमण कमी होण्याऐवजी अधिकच वाढण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेने गावातील प्रत्येक कुटुंबाची कोरोना चाचणी तत्काळ पूर्ण करून उपाययोजना राबविणे गरजेचे असताना अपेक्षित चाचण्या होताना दिसत नाही. तीन-चार दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचणीचे अहवाल दुहेरी संख्येत पॉझिटिव्ह आल्याने गावात चाचणीचा वेग वाढविणे गरजेचे होते;मात्र १० मे रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर आरोग्य विभागाचे तपासणी पथक गावात दाखल झाल्याने अपेक्षित तपासण्या होऊ शकल्या नाहीत तर ११ मे रोजी सुद्धा तपासणी न झाल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे.
....
आणखी किती मृत्यूची वाट बघणार?
सुकांडा गावात कोरोनाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. चौघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन अपेक्षित उपाययोजना करण्यात असमर्थ ठरत असल्याने प्रशासन आणखी नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहणार असा सवाल सुकांड्याचे सरपंच कैलासराव घुगे यांनी उपस्थित केला.