आंदाेलनात सहभागी हाेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:38+5:302021-03-16T04:41:38+5:30
रिसोड : भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्यातर्फे दरवर्षी १९ मार्चला अन्नत्याग आंदोलन ...
रिसोड : भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्यातर्फे दरवर्षी १९ मार्चला अन्नत्याग आंदोलन केले जाते. १९८६ साली यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व मालती साहेबराव करपे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह शासकीय धोरणाला व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून त्याकडे पाहले जाते. त्यामुळेच १९ मार्च हा दिवस सहवेदना दिवस पाळून राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना एकदिवसीय अन्नत्याग करून सहवेदना अर्पण केली जाते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून १९ मार्चला एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यादिवशी दिवसभर अन्नत्याग करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी केले आहे.