खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:30 AM2021-06-08T11:30:41+5:302021-06-08T11:30:48+5:30

Auditing of private hospitals in Washim : वाशिम शहरातील २२ रुग्णालयांचे ऑडिट करणे सुरू आहे; तर सेक्युरा हाॅस्पिटलला ५७१ रुग्णांचे पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला.

Auditing of private hospitals; Rs 13 lakh returned! | खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; १३ लाख रुपये केले परत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अति तीव्र ठरली. यादरम्यान रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी भरती झालेल्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावे, यासाठी कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आली. त्यानुषंगाने खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी २० ऑडिटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधितांकडून आता वाशिम शहरातील २२ रुग्णालयांचे ऑडिट करणे सुरू आहे; तर सेक्युरा हाॅस्पिटलला ५७१ रुग्णांचे पैसे परत करण्याचा आदेश देण्यात आला असून, या हाॅस्पिटलने आतापर्यंत ३२५ रुग्णांचे १३ लाख ४२ हजार ३०० रुपये परत केले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यासंबंधी शासनस्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार, वाशिम शहरातील २२ रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या देयकांवर लक्ष ठेवले जात आहे. सदर रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या देयकांची तपासणी करणे व विहित दरानुसार दर आकारणी केली जाते किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पथक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. 
दरम्यान, आतापर्यंत वाशिममधील एकमेव सेक्युरा हाॅस्पिटलच्या तपासणीत ५७१ रुग्णांच्या देयकात त्रुटी आढळून आल्या.दरम्यान, आतापर्यंत वाशिममधील एकमेव सेक्युरा हाॅस्पिटलच्या तपासणीत ५७१ रुग्णांच्या देयकात त्रुटी आढळून आल्या.


शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करून खासगी कोविड हाॅस्पिटलकडून कोरोना बाधितांकडून आकारण्यात आलेल्या देयकांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत झालेल्या तपासणीदरम्यान सेक्युरा हाॅस्पिटलने आकारलेल्या देयकांमध्ये त्रुटी आढळून आल्या. ५७१ जणांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ३२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
- शन्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Auditing of private hospitals; Rs 13 lakh returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.