नरेश गजभिये यांच्या वडिलांच्या व आईच्या नावाने शेती आहे. आईच्या नावे २०१६ ते २०१७ मध्ये बँक आँफ महाराष्ट्र शाखा कांरजामधून पीक कर्ज घेतले. नंतर जुने कर्ज भरून नवीन कर्जसुध्दा घेतले. त्यानंतर महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळाली. आईच्या नावाने पुन्हा पीक कर्ज मागितल्यावर त्यावर बोजा आहे. असे सांगून आईच्या नावे पीक कर्ज दिले नाही, असे निवेदनात नमूद आहे. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर बँकेत आठ दिवसांनी विचारपूस केली असता फेरफार चुकीचा आहे, असे सांगून प्रस्ताव परत केला. तलाठ्याकडून फेरफारमध्ये दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा प्रस्ताव सादर केला. परंतु, त्यावर बोजा आहे, असे सांगून कर्ज प्रकरण नाकारले. त्यानंतरही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. परंतु, कर्ज प्रकरण मंजूर केले नाही, असे नरेश गजभिये यांनी तक्रारीत म्हटले आहे.
००००००००००००
कोट
कर्ज असताना तलाठ्यांनी फेरफार केल्यामुळे बँकेला कर्ज देता येणार नाही. त्यामुळे त्यांचे कर्ज प्रकरण रद्द करण्यात आले.
- कपील वानखडे
व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, कारंजा
०००
कोट
कोणत्याही बँकेचे कर्ज हे जमिनीवर असल्यामुळे ज्या ज्या पध्दतीने जमिनीचे व्यवहार होतात, त्या पध्दतीने पुढे पुढे जातात. तसेच आज रोजी सातबारावर कोणत्याही प्रकारचा बोजा नसेल व इतर बँकेचे कर्ज नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र आणल्यास बँकेने त्या खातेदारास कर्ज द्यावे. तसेच या प्रकरणाची तहसीलदारांमार्फत सखोल चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- राहुल जाधव,
उपविभागीय महसूल अधिकारी, कारंजा